अंजली प्रकाश कुलकर्णी - लेख सूची

आर्थिक साहाय्यातून साम्राज्यवाद

[AID As IMPERIALISM (१९७१, पेंग्विन) या पुस्तकाचा परामर्श अंजली प्रकाश कुलकर्णी यांनी जाने-मार्च १९९७ च्या ‘अर्थसंवाद’ या नियतकालिकासाठी घेतला. त्या लेखाचा हा संक्षेप] विदेशी साहाय्य हे उदार अंत:करणाने व निःस्वार्थ बुद्धीने केलेले वित्तीय साधनसंपत्तीचे विनाअटींचे हस्तांतरण होय या कल्पनेला कधीच तिलांजली मिळाली आहे. १९६१ मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष जॉन केनेडी यांनी अमेरिकेचे जगावरील सार्वभौमत्व, दबाव व …